खेड - आय.सी.एस. महाविद्यालय खेड रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्य केंद्र (चखढडउ) यांच्या सहकार्याने ‘करिअर कट्टा इंडक्शन सेशन’ दोन स्वतंत्र सत्रांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना करिअर कट्टा उपक्रमाची माहिती देणे, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे हा होता.
पहिल्या सत्रामध्ये कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉ. सी. आर. साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी करिअर कट्टा उपक्रमाचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांची तयारी, करिअर नियोजन, कौशल्य विकास आणि शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा याबाबत सविस्तर माहिती दिली. दुसर्या सत्रामध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रा. सुप्रिया काडगे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बदलत्या काळातील करिअरच्या संधी, व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य, आत्मविश्वास, वेळेचे व्यवस्थापन आणि कौशल्य विकासाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच करिअर कट्टा उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना करिअर कट्टा हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभाग यांचा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा योग्य उपयोग करून आपली कौशल्ये विकसित करावीत, स्पर्धात्मक युगात स्वतःला सक्षम बनवावे आणि उज्ज्वल भविष्य घडवावे, असे त्यांनी मार्गदर्शन केले. दोन्ही सत्रांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअर नियोजनाची नवी दिशा मिळाली असून आगामी करिअर कट्टा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.