loader
Breaking News
Breaking News
Foto

‘वझरे वेंदात कोक’ कंपनीत अवैध कोळसा वाहतूक करणार्‍या कर्नाटक येथील ट्रकने बैलाला चिरडले; कोळसा वाहतूक विरोधात तीव्र संताप;

दोडामार्ग(प्रतिनिधी)- दोडामार्ग तालुक्यातील ‘वझरे वेंदात कोक’ कंपनीत गोवा राज्यातून, रात्रीच्या वेळी अवैध ओव्हर लोड कोळसा वाहतूक केली जाते, या कोळसा वाहतूक ट्रक डंपर मुळे अनेक अपघात घडले आहेत. शिवाय रस्ता कडेला असलेल्या घरातील लोकांची वाहतूक मुळे झोपमोड होते अशा प्रकारे अवैध कोळसा वाहतूक करणार्‍या कर्नाटक पासिंग ट्रकने वेंदात कोक कंपनीच्या गेट समोर स्थानिक शेतकरी यांच्या बैलाला चिरडून मारल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कोळसा वाहतूक मनमानी करणार्‍यांना वाहतूक अधिकारी पाठीशी घालत आहेत यामुळे कोळसा वाहतूक वाहन धारकांची मुजोरी वाढत चालली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वझरे वेंदात कोक कंपनीत मोठया प्रमाणात रात्री डंपर तसेच बारा चाकी ट्रक मधून अवैध कोळसा वाहतूक केली जाते सर्व कोळसा वाहने ही ओव्हर लोड असतात पण आजपर्यंत दोडामार्ग पोलीस किंवा आर. टी. ओ. कडून कारवाई झालेली नाही. अनेक वाहने याना वाहतूक परवाना महाराष्ट्र नाही तरी कर्नाटक मधील वाहने जास्त प्रमाणात आहेत.

टाइम्स स्पेशल

मंगळवारी रात्री गोवा येथून वेंदात कोक कंपनीत कोळसा वाहतूक करणारा ट्रक के. ऐ. ३७-बी.४०८३ ट्रक चालकाने वेंदात कोक कंपनीच्या गेटसमोर असलेल्या, चार पाच गुरापैकी या ठिकाणी एका बैलावर ट्रक चढवला. यामुळे बैल काही अंतर फरफटत गेला. जागीच ठार झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg