loader
Breaking News
Breaking News
Foto

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किशोरवयीन मुली आणि महाविद्यालयीन तरुणींसाठी आरोग्य शिबीर

मालवण (प्रतिनिधी) - युवती हे देशाचे भवितव्य आहे, एक सशक्त स्त्रीच सशक्त समाजाची निर्मिती करू शकते. महाविद्यालयीन वयातच युवतीने आपल्या भविष्याची काळजी घेतली पाहिजे. आजच्या युवतीने मानसिक व शारीरिक दृष्ट्या सशक्त होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे सहसचिव साबाजी गावडे यांनी कट्टा महाविद्यालयाच्या वतीने आयोजित महिला आरोग्य शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व माझे गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत ग्रामीण रुग्णालय कट्टा पेंडूर व डॉ. दादासाहेब वराडकर कला वाणिज्य महाविद्यालय कट्टा च्या महाविद्यालय विकास समितीच्या वतीने किशोरवयीन मुली आणि महाविद्यालयीन तरुणीं साठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उदघाटन आनंद वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. जाई पोळ, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, इंग्लिश मीडियम स्कूल कट्टाचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, उपप्राचार्य रवींद्र गावडे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. या कार्यक्रमास जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. बालन, जिल्हा दंतचिकित्सक डॉ. चाटे, ग्रामीण रुग्णालय कट्टा पेंडूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. जाई पोळ व सर्व आरोग्य कर्मचारी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण चे सर्व आरोग्य कर्मचारी यांनी कट्टा संस्थेच्या तिन्ही विभागाच्या किरोरवयीन मुली व महाविद्यालयीन युवती तसेच सर्व महिला शिक्षिका व कर्मचारी असे एकूण २१९ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

तसेच या प्रसंगी भारत सरकारच्या नशामुक्ती कार्यक्रमाअंतर्गत उपस्थितांना नशा न करण्याविषयी शपथ देखील देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विकास कक्ष सहाय्यक प्रा. श्रुती कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. पौर्णिमा मसुरकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg