loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखच्यावतीने खुल्या लेख स्पर्धेचे आयोजन

संगमेश्वर (प्रतिनिधी) - श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय, देवरुखचे माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी यांचे स्मृतीप्रित्यर्थ खुली लेख स्पर्धा(वर्ष ९वे) आयोजित करण्यात आली आहे. सदर लेख स्पर्धेसाठी पुढील विषय देण्यात आले असून, यापैकी कोणत्याही एका विषयावर सहभागी स्पर्धकांनी लेख लिहायचा आहे. लेख स्पर्धेचे विषय: १) वर्तमान जनआंदोलनांची वास्तवता, २) डॉ. विजया मेहता यांचे नाट्य चळवळीतील योगदान असे दोन विषय आहेत. या लेख स्पर्धेसाठी शब्दमर्यादा किमान शब्द १२००, तर कमाल शब्द १५०० आहे. लेख स्पर्धेचे गुणांकन निकष पुढीलप्रमाणे असतील: अ)विषय: खोली आणि विस्तार: गुण– ४०. ब)मांडणी: आरंभ, मध्य आणि शेवट: गुण- २० क)भाषा शैली: ओघवती, आकर्षक आणि अलंकारिक: गुण- २०. ड)शुध्दलेखन: गुण- १०. इ)सर्वसामान्य प्रभाव: गुण- १० असे एकूण १०० गुण असतील. स्पर्धेसाठीचा लेख कागदाच्या एका बाजूला समास सोडून सुवाच्य अक्षरात लिहिलेला अथवा टंकलिखित केलेला असावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचे लेख रविवार, दि. ३० ऑगस्ट, २०२६ पर्यंत वाचनालयात ग्रंथपालांकडे कार्यालयीन वेळेत (सकाळी ९ ते दुपारी १२:०० व सायं.४:०० ते ७:०० यावेळेत (सुट्टीचा वार सोमवार सोडून))आणून द्यावेत किंवा कुरिअर/पोस्टाने पाठवावेत. लेख वाचनालयाच्या ई–मेल वरही पाठविता येईल. वाचनालयाचा ई– मेल ta6409001@gma.com असा आहे. सदर लेख Unicode मध्ये टाईप करून पाठवावा. लेखासोबत स्वतंत्र कागदावर स्पर्धकांने आपले पूर्ण नाव, पत्ता, फोन/ मोबाईल नंबर लिहून पाठवावा. स्पर्धेच्या लेखावर कोठेही आपले नाव वा ओळख लिहू नये. स्पर्धेत गुणानुक्रमे प्रथम ३ क्रमांकांना पारितोषिक, ग्रंथभेट आणि प्रमाणपत्र दिले जाईल. काही लेखांचा उत्तेजनार्थ विचार केला जाईल. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रथम क्रमांक – रु.१०००/-, व्दितीय क्रमांक – रु.७५०/-, तृतीय क्रमांक रु.५००/- अशी पारितोषकाची रक्कम असणार आहे.

टाईम्स स्पेशल

स्पर्धेसंबंधीचे सर्व अधिकार वाचनालयाने राखून ठेवले आहेत. वाचनालयातर्फे जाहीर करण्यात आलेला स्पर्धेचा निकाल सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. साधारणत: ऑक्टोबर २०२६च्या दुसऱ्या आठवड्यात स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल. मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक, ग्रंथ व प्रमाणपत्र वितरण केले जाईल. लेख स्पर्धेसाठी अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी होऊन लेख स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी केली आहे. स्पर्धकांनी पूर्वकल्पना दिल्यास स्पर्धा निकालानंतर १५ दिवसांनी स्पर्धकांना इतरांचे लेख पहाता येतील. स्पर्धेविषयीच्या अधिक माहितीसाठी ९४२३२९७३५८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg