दापोली (चंद्रशेखर जोशी) : आपल्या देदिप्यमान वाटचालीद्वारे प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर उंचावत ठेवीत असलेल्या दापोली अर्बन को-ऑप. बँक लि., दापोली या बँकेची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी नवभारत छात्रालय, सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह दापोली येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेकरीता बँकेचे १२५० भागधारक सभासद उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला अहवाल सालामध्ये मृत पावलेले राजकीय व सामाजिक नेते, शहीद झालेले भारतीय जवान, बँकेचे माजी अध्यक्ष तसेच बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विषयवार कामकाजाला सुरुवात करण्यापुर्वी बँकेच्या भागधारक सभासदांपैकी ज्या सभासदांनी विशेष नांवलौकीक मिळविला आहे, अशा सभासदांचा दापोली अर्बन बँकेचे संचालक मंडळ व सर्व भागधारक सभासदांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
बँकेचे भागधारक सभासद डॉ. संदिप राजपुरे यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाल्याबद्दल व सुधीर कालेकर आणि प्रितम रुके यांना समाजरत्न व समाजभुषण हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभानंतर सभेचे विषयवार कामकाज सुरु करण्यात आले. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेला रु. ४,६८,६१,७००/- इतका निव्वळ नफा झाला असल्याचे बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांनी सभेस विदीत केले. दि. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु. ५२६ कोटी ९९ लाख व एकूण कर्ज वाटप रु. ३४३ कोटी ६१ लाख इतके झाले असून बँकेचा एकत्रित व्यवसाय ८७० कोटीच्या पुढे गेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेची ठेववाढ ही १६ टक्के इतकी झाली असल्याने उपस्थित सभासदांनी त्याबद्दल समाधान व्यक्त करुन संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी बँकेचे भागधारक सभासदांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी बँकींग क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक डॉ. चिंतामणी वैजापुरकर हे मार्गदर्शक होते. रिझर्व्ह बँकेचे मार्गदर्शक सुचनेप्रमाणे ही बँक आपले कामकाज करीत असून रिझर्व्ह बँकेने निर्धारीत करुन दिलेल्या निकषांचे या बँकेने तंतोतंत पालन केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर, यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले संचालक मंडळ व त्यांची निर्णय प्रक्रिया आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले प्रत्यक्ष कामकाज उत्कृष्ठ असल्यामुळे बँकेने रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार आर्थिक दृष्टया सक्षम बँकेचा दर्जा प्राप्त केला असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. विषयपत्रिकेवरील विषयवार कामकाज बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव थोरात यांनी पुर्ण केल्यानंतर बँकेचे ज्येष्ठ संचालक माधव शेटवे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.