दापोली (शशिकांत राऊत) : सार्वजनिक बांधकाम विभागाला आपल्या अखत्यारीत असलेल्या देखभाल दुरुस्तीच्या रस्त्यांची कामे करण्यास सपशेल अपयश आले असल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेत वाढ झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दापोली येथील सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या दप्तरी नोंद असलेला आणि वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला चिखलगाव बोरीवली कोळथरे नावाचा रस्ता हा देखभाल दुरुस्ती करिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ मोठाल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक ही धोक्याची झाली आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होवू लागले आहेत. अशाप्रकारचे वास्तव असताना देखील अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. त्यामुळे रस्ता सुधारणेच्या प्रतिक्षेतच आहे. या रस्त्याची वाहतुकिच्या दृष्टीने असलेली उपयुक्तता लक्षात घेऊन किमान रस्त्यातील खड्डे बुजवून रस्ता वाहतूक करणे आवश्यक होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांची एकुणच अनास्था ही या रस्त्यावरुन प्रवास करणार्यांना भोगावी लागते आहे. अजून किती अपघाताच्या घटना घडल्यानंतर वा कोणाचा हकनाक बळी गेल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभाग जागे होणार आहे, हे मात्र देवच जाणे. कारण रस्त्यावरील खड्डे हे काही एका दिवसात वा या वर्षीच्या पावसाळ्यातच पडले आहेत, असे नाही त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच रस्त्यातील खड्डे बुजवून टाकणे क्रमप्राप्त होते मात्र ते झाले नाही त्यामुळे आता रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे गढुळ पाणी तुंबून राहत आहे.
अशा रस्त्यावरुनच वाहन चालकांनी आपल्या ताब्यातील वाहन चालवताना कोणता खड्डा चुकवायचा आणि कोणता नाही याची तारेवरची कसरत करतच अंतर काटावे लागत आहे. पंचनदी कोळथरे परिसरात अनेक गावांना या रस्त्याचाच वाहतुकिसाठी उपयोग करावा लागत असल्याने अशा या वर्दळीच्या रस्त्याची सुधारणा ऐरणीवर आली असली तरी माय बाप बांधकाम विभाग ही महत्वाची समस्या सोडविण्यासाठी लक्षच देत नाही.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.