दोडामार्ग, (प्रतिनिधी) : तळकट येथील सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत (रेशन) वितरित करण्यात आलेल्या गव्हामध्ये कागदाची रद्दी, प्लास्टिकचा कचरा तसेच गुटख्याचे रॅपर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे रेशनकार्डधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तळकट येथील रेशनकार्डधारक उमेश सावंत यांना मिळालेल्या गव्हाची स्वच्छता करताना त्यामध्ये कागदाचे तुकडे, प्लास्टिकचा कचरा आणि गुटख्याचे रॅपर आढळून आले. त्यांनी या प्रकाराचे छायाचित्रही काढले असून त्यातून धान्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
"रेशनमधून मिळणारे धान्य हे गरीब व गरजू नागरिकांसाठी महत्त्वाचे असते. मात्र अशा प्रकारे कचरा मिसळलेले धान्य मिळाल्यास ते वापरणे धोकादायक ठरू शकते. धान्य स्वच्छ करण्यासाठी अतिरिक्त वेळ खर्च करावा लागतो, शिवाय यामुळे मानसिक त्रासही सहन करावा लागतो," अशी प्रतिक्रिया उमेश सावंत यांनी दिली. धान्याची साठवणूक, हाताळणी अथवा वाहतूक करताना योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, तसेच रेशनकार्डधारकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार धान्याचा पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी उमेश सावंत यांनी केली असून यासंदर्भात पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.