loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्र सरकारला सवर्ण मतदारांची नाराजी उत्तर प्रदेश मध्ये जड जाईल ...भाजपच्याच एका गटाचा इशारा !

नवी दिल्ली : बिहारच्या बांकीपूर निवडणुकीनंतर मतदारांचा सूर बदलताना दिसतो आहे, उत्तर प्रदेश निवडणुकीवर याचा परिणाम होऊ शकतो, राज्यातील सुवर्ण समाजाने इशारा दिला आहे, केंद्र सरकारने सवर्ण समाजाची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा मतदार पाठ फिरवतील, सरकारला जड जाईल, असा इशारा भाजपाच्या एका वर्गाने तसेच तेथील सवर्ण समाजाचे प्रमुख नेते आता देऊ लागले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनीच असा इशारा दिला आहे की उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आता जवळ येत आहे अशातच सवर्ण समाज भाजपापासून दूर जाताना दिसतो आहे, बिहारच्या बांकीपुर निवडणुकीचा परिणाम येथे जाणवू लागला आहे.

टाइम्स स्पेशल

जंतर-मंतरवर झालेल्या पोलीस कारवाईनंतर त्याचे परिणाम उत्तर भारतात दिसत असल्याचे भाजपाच्या एका गटाने म्हटले आहे. जंतर नंतर वरील आंदोलनाची सुरुवात आंबेडकरवादी जनतेने केली, त्यानंतर मोठ्या प्रमाणात सवर्ण समाजाची मुले मुली या आंदोलनात सहभागी झाली, त्याचा परिणाम उत्तर भारतात दिसून येत आहे, असे भाजपाच्या एका गटाने म्हटले आहे. देशभरातच जंतर-मंतर वरील विद्यार्थी आंदोलनाचा दीर्घ परिणाम दिसून येत असून भविष्यात याचे परिणाम निवडणुकीत होतील, असेही भाजपाच्याच एका नेत्याने येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg