loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचायत समिती राजापूर यांच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

राजापूर - पर्यावरण संवर्धन आणि हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी, राजापूर ग्रामविकास अधिकारी संघटनेच्या पुढाकारातून, पंचायत समिती राजापूर यांच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांचे लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पंचायत समितीच्या आवारात विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आमदार किरण सामंत यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ‘‘वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, ती प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करून, ती जगविणे अधिक महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पुढील पिढीला स्वच्छ, निरोगी वातावरण देण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवडीचा संकल्प केला पाहिजे.’’ ते पुढे म्हणाले की, ‘‘वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि तापमानवाढ यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन हाच प्रभावी मार्ग आहे. शासनाच्या विविध उपक्रमांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास, पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक होईल,’’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

राजापूर ग्रामविकास अधिकारी संघटनेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. शासनाच्या विकासकामांसोबत पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही समाजाने स्वीकारावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचा निर्धार व्यक्त करत, हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg