loader
Breaking News
Breaking News
Foto

बावनदी पुलावरून नदीत पडलेल्या महेश भरणकर यांचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

संगमेश्वर(प्रतिनिधी)- बावनदी रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर) येथील महेश नारायण भरणकर (वय ४२) यांचा मृतदेह बेपत्ता झाल्यानंतर चौथ्या दिवशी बावनदी पुलाजवळ सुमारे ३०० मीटर अंतरावर नदीपात्रात आढळून आला. शुक्रवारी सकाळी महेश भरणकर हे बावनदीच्या जुन्या पुलावर बसले असताना त्यांचा तोल जाऊन ते नदीत पडले होते. घटनेनंतर सलग चार दिवस त्यांचा शोध सुरू होता. अखेर सोमवारी त्यांचा मृतदेह पुलापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर आढळून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितीश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, स्थानिक पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने नदीपात्र आणि आजूबाजूच्या परिसरात सातत्याने शोधमोहीम राबविण्यात आली. या संयुक्त प्रयत्नांमुळे चौथ्या दिवशी मृतदेहाचा शोध लागला. या दुर्दैवी घटनेमुळे बावनदी परिसरात हळहळ व्यक्त होत असून महेश भरणकर यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg