मकरंद सुर्वे(संगमेश्वर) - सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग, युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्याची तळमळ आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत कुडवली येथील सूरज संतोष जाधव यांची राष्ट्रीय दलित पँथर सेना यांच्या कोंकण प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सूरज जाधव हे सूरज क्रिकेट ऍकॅडमीचे क्रिकेट प्रशिक्षक असून, ग्रामीण भागातील अनेक युवकांना दर्जेदार क्रिकेट प्रशिक्षण देण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. क्रीडा क्षेत्रासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, युवकांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे संस्थापक व अध्यक्ष टिपू पटवेगार यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आस्मा वसीम शेख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस पँथर वसीम भाई तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पँथर पैलवान सचिन भोसले उपस्थित होते. या नियुक्तीमुळे कोंकण विभागातील संघटनात्मक कार्याला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकार्यांनी व्यक्त केला. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार करत युवकांना संघटित करून सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सूरज जाधव प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
संघटनेला नवी दिशा, नवी ऊर्जा, नवा आवाज हे ध्येयवाक्य प्रत्यक्षात उतरवत कोंकणातील वंचित, शोषित आणि पीडित घटकांच्या न्यायहक्कांसाठी संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल. युवकांना सामाजिक परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना सूरज जाधव यांनी व्यक्त केली. या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील मान्यवरां कडून सूरज जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.