loader
Breaking News
Breaking News
Foto

‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान’च्या जीवनदायी कार्याचा राज्यस्तरीय गौरव

सावंतवाडी: रक्तदान, प्लेटलेटदान, अवयवदान व देहादान आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्तघटक उपलब्ध करून देत समाजासाठी अत्यंत मोलाचे व जीवनदायी कार्य करणाऱ्या ‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान’ च्या समाजोपयोगी कार्याचा राज्यस्तरावर गौरव ग्राहक पंचायत महाराष्ट्र आयोजित पुणे येथील राज्य अधिवेशन २०२६ मध्ये सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला ‘ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. वडगाव मावळ,पुणे येथे झालेल्या या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून ग्राहक बंधू-भगिनी तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तदान, प्लेटलेटदान, अवयवदान व देहादान, रक्तदाते जोडणी आणि गरजू रुग्णांना तातडीने रक्तघटक उपलब्ध करून देण्याच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा संस्थापक सदस्य सचिन गुंड आणि दोडामार्ग - सावंतवाडी तालुका विभागीय अध्यक्ष तथा गोवा समन्वयक व ग्राहक पंचायत वेंगुर्ला पदाधिकारी संजय पिळणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या गौरवामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक आणि रक्तदान चळवळीला राज्यस्तरीय व्यासपीठावर विशेष मान्यता मिळाली आहे.‘रक्तदान हेच जीवनदान’ या भावनेतून कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमांचे हे यश मानले जात आहे. हा सन्मान सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य, गोवा व कर्नाटक अशा विविध भागात कार्यरत असणाऱ्या सर्व पदाधिकारी तसेच सर्व सदस्यांचा तसेच हितचिंतक व सल्लागार तसेच जिल्ह्यातील सर्व मित्रसंस्था आणि रक्तपेढ्यां या सर्वांचा आहे, असे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, पदाधिकारी सचीन गुंड व संजय पिळणकर म्हणाले.

टाईम्स स्पेशल

अधिवेशनाच्या मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी न्यायमूर्ती सुरेन्द्र तावडे, माजी मंत्री सुधीर मुनगुंटीवार, आमदार राजेंद्र पवार, सहकार वस्त्र उद्योगमंत्री सुभाषबापू मा.देशमुख,मावळ विधानसभा आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.विजय लाड, राज्य सचिव अरुण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, रक्तदाते व शुभेच्छुकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg