संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील दलित सेवा संस्था संचलित प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा तसेच कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष चंद्रकांत यादव (दादा) यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या परिसरात उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी मुख्याध्यापक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून यादव यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाची सुरुवात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी चंद्रकांत यादव यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्थात्मक कार्याचा गौरव करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, १९७७ साली चंद्रकांत यादव यांनी शिक्षणाचे जे छोटे रोपटे लावले, त्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि संस्थेची सातत्याने प्रगती व्हावी यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज संस्था शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. संस्थेचे कार्यवाह वैभव यादव यांनी आपल्या भाषणात अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संस्थेने केलेली प्रगती अधोरेखित केली. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा, इमारती, प्रयोगशाळा, विविध उपक्रम आणि शैक्षणिक वातावरण उभारण्यासाठी चंद्रकांत यादव यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केलेल्या कार्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. शिक्षक प्रतिनिधी नामदेव पाटील यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेताना प्राथमिक विभागापासून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत संस्थेचा विस्तार कसा झाला, यामध्ये अध्यक्षांचे योगदान किती महत्त्वपूर्ण राहिले, यावर प्रकाश टाकला. प्रशालेचे मुख्याध्यापक विजय पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, चंद्रकांत यादव यांनी उभारलेला हा शैक्षणिक वटवृक्ष पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे.
संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रगती भविष्यातही अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चंद्रकांत यादव यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर वाढदिवसानिमित्त केक कापून सर्वांनी त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि समाजसेवेचे कार्य अखंड सुरू राहावे, अशा शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेच्या खजिनदार सई वैभव यादव, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, कार्यवाह वैभव यादव, श्रीकांत यादव, माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाश रसाळ, निवे बुद्रुक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र यादव, उपाध्यक्ष अजय वाघाटे, सचिव विजय वाघाटे, सुरेश रसाळ, वासुदेव यादव, जयराम यादव, माजी मुख्याध्यापक मगर, माजी मुख्याध्यापक गुरव, प्रमोद आगरे, संतोष माने, संजय जाधव, कै. सौ. मीनाताई ठाकरे विद्यालयाचे मुख्याध्यापक बळवंत नलावडे तसेच संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, चंद्रकांत यादव यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.