वरवेली (वार्ताहर) - गुहागर तालुक्यातील आरजीपीपीएल कंपनीकडून अंजनवेल, वेलदूर व रानवी ग्रामपंचायतला प्राप्त झालेल्या जमीन व मालमत्ता कराच्या रक्कमेचे यश व श्रेय हे तिन्ही ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ यांचेच आहे. तिन्ही ग्रामपंचायतच्या अटी व शर्ती कंपनीला मान्य नसतील तर जप्तीची कारवाई आम्ही पुन्हा चालू करणार आहोत, जप्तीची कारवाई कोणत्याही प्रकारे रद्द केलेली नाही, जप्तीची कारवाई पुन्हा चालू करून उर्वरित राहिलेला कर आम्ही घेऊ, तसेच आता दिलेल्या कराच्या रकमेमध्ये दंडाचा समावेश नसल्याची माहिती तिन्ही ग्रामपंचायत सरपंचांनी पत्रकार परिषदमध्ये दिली. वेलदूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तिन्ही ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच व ग्रामस्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला अंजनवेल ग्रामपंचायत सरपंच सोनल मोरे, वेलदूर सरपंच दिव्या वनकर, रानवी ग्रामपंचायत प्रशासक मनाली कदम, अंजनवेल उपसरपंच बालकृष्ण सुर्वे, वेलदूर उपसरपंच राजू जावळे, योगेश धामणस्कर, नंदकुमार खेतले, शरद यादव, प्रमोद पटेकर, मारुती रोहीलकर, इकबाल पंची, सायली घरट, रूपाली जाधव, राजू खातू, प्रवीण पड्याळ, सागर पड्याळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना वेलदूर सरपंच दिव्या वनकर यांनी सांगितले की, गुरुवारी गुहागर पंचायत समिती सभापती दालनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेची आम्हा तिन्ही ग्रामपंचायत सरपंचाना पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती, सभापतींचा सन्मान राखून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, आमचा त्यांनी सत्कार केला ही त्यांची भावना चांगली होती, आम्ही त्यासाठी त्यांचे आभारी आहोत, परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय श्रेय वादाची भाष्य व चर्चा करण्यात आली, काही लोकप्रतिनिधी कंपनीच्या बाजूने बोलत होते अशीही चर्चा झाली, परंतु कंपनीकडून थकीत कर वसुली संदर्भात तिन्ही ग्रामपंचायती जेव्हा लढा देत होतो तेव्हा आमदार भास्कर जाधव सोडून कोणत्याही राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधीकडून कोणीही बैठका घेतल्या नव्हत्या, त्यामुळे आता राजकीय खेचाखेच करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही, तिन्ही ग्रामपंचायतला प्राप्त झालेली कराची रक्कम ही तिन्ही गावातील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी पंचायत समिती विस्तार अधिकारी,गटविकास अधिकारी व रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झालेले यश आहे. त्यामुळे वैयक्तिक कोणाचे श्रेय नसून तसेच वैयक्तिक मार्गदर्शनामुळे कोणतीही गोष्ट कोणीही केलेली नाही. हे श्रेय कुणाचे वैयक्तिक नसून तिन्ही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ यांना जात आहे, या लढ्यामध्ये राजकीय सहकार्य घेतलेले नाही त्यामुळे कुणी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे असे कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही, कुठच्याही लोकप्रतिनिधी बरोबर कोणाची बैठक झालेली नाही, त्यामुळे यश व श्रेय फक्त आणि फक्त तिन्ही ग्रामपंचायतला जात आहे, ग्रामपंचायत अधिनियम नुसार आम्ही आरजीपीपीएल कंपनीवर जप्तीची कारवाई करणार होतो, त्यांनी कर द्यायला होकार दिल्यामुळे जप्तीच्या कारवाईला आम्ही स्थगिती दिलेली आहे,त्यामुळे कोणतेही राजकीय पक्षाचा या ग्रामपंचायतला प्राप्त झालेल्या कराशी संबंध येत नाही.
आमदार भास्कर जाधव सोडून इतर कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे चर्चा केलेली नाही किंवा बैठक घेतलेली नाही, तसे आमच्या कधीच निदर्शनास आलेले नाही, पंचायत समिती सदस्य सारिका दाभोळकर यांनी कर वसुलीसाठी पुढाकार घेऊन काम केलेले आहे असे म्हटले गेले, परंतु आमच्या तरी तसे निदर्शनात आलेले नाही, आमच्यासाठी हा संशोधनाचा विषय येऊन ठेपलेला आहे. त्यांचे काही सहकार्य आम्हाला दिसले नाही. कंपनीने दिलेला कर हा ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येईल, तसेच आमच्या अटी शर्ती कंपनीला मान्य नसतील तर जप्तीची कारवाई आम्ही पुन्हा चालू करणार आहोत, जप्तीची कारवाई कोणत्याही प्रकारे रद्द करण्यात आलेली नाही, जप्तीची कारवाई पुन्हा चालू करून उर्वरित कर आम्ही नक्कीच प्राप्त करू असे त्यांनी शेवटी सांगितले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.