loader
Breaking News
Breaking News
Foto

आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलीस ठाण्यात पो. नि.. निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

केळंबे-लांजा दी8ऑ(सिराज नेवरेकर)आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलीस ठाण्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील मुस्लिम समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येत्या २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद सण सर्वत्र साजरा होणार आहे. या निमित्ताने लांजा पोलीस ठाणे येथे शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत लांजाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बोलताना ईद-ए-मिलादच्या मिरवणूक आणि धार्मिक कार्यक्रमांबाबत महत्वाच्या सूचना दिल्या. यामध्ये मिरवणुकीचे मार्ग, वेळेचे बंधन आणि ध्वनीप्रदूषण संदर्भातील शासकीय नियमांचे पालन करावे. तसेच वाहतूकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

टाइम्स स्पेशल

हा सण आनंदाचा आणि सलोख्याचा संदेश देणारा असतो. त्यामुळे कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवांवर विश्वास न ठेवता सलोखा राखत काही संशयास्पद आढळल्यास थेट पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले.यावेळी उपस्थित तालुक्यातील मुस्लिम समाजातील पदाधिकारी व सदस्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद-ए-मिलाद अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि सर्वधर्मीय बंधुभाव राखून साजरी केली जाईल, अशी ग्वाही मुस्लिम बांधवांनी दिली.दरम्यान, या बैठकीला तालुक्यातील मुस्लिम समाजातील प्रतिनिधी, पदाधिकारी, मोहल्ला समितीचे सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg