loader
Breaking News
Breaking News
Foto

नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयात ए.आय मधील करिअर मार्गदर्शन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील माखजन सरंद येथे माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन च्या ॲड.पी.आर.नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी व १२ मधील विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ए.आय मध्ये अभियांत्रिकी करिअर संदर्भात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी वेळणेश्वर येथील, महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वेळणेश्वर चे तज्ञ प्राध्यापक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रा. भक्ती पवार,प्रा.गजानन खापरे,प्रा. विनोद साळुंखे आदीनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.प्रामुख्याने ए.आय.सक्षम मायक्रोकंट्रोलर अनुप्रयोग आणि क्लाऊड आधारित डेटा विश्लेषण हा कार्यशाळेचा प्रमुख विषय होता. ए.आय मधील भविष्यातील सुवर्ण संधी आणि ए.आय चा होत असलेला सर्व क्षेत्रातील वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.ए.आय मध्ये अभियांत्रिकी पदवी घेणे येणाऱ्या काळासाठी किती महत्वाचे आहे तसेच करिअर म्हणून कसा महत्वाचा पर्याय आहे याविषयी माहिती देण्यात आली. प्रशालेच्या अद्ययावत संगणक कक्षात काही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

टाईम्स स्पेशल

कार्यशाळेच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव परब यांनी महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वेळणेश्वरच्या तज्ञ प्राध्यापकांचे स्वागत केले. कार्यशाळेवेळी सूत्रसंचालन प्रा गौरव पोंक्षे यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक अंबादास घाडगे, अभिजित सहस्त्रबुद्धे, प्रा अभिजित सुर्वे, प्रा मालती गुरव, अजिंक्य पावसकर आदी उपस्थित होते. यावेळी कार्यशाळेअंती गौरव पोंक्षे यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg