loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोस श्री गिरोबा विद्यालयात वनविभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण व मार्गदर्शन

आरोस - छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरानिमित्त आरोस येथील श्री गिरोबा विद्यालयात वनविभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण, वने तसेच वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व पटवून देत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास वनपाल विजय दाते, वनरक्षक प्रकाश रानगिरे व वनसेवक चंद्रकांत पडते उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे योगदान तसेच वन्यजीवांचे संरक्षण करण्याची गरज याविषयी माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमात श्री गिरोबा विद्यालयातील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपण केले. वृक्षारोपणानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक उमेश मुरकुटे, शिक्षक फिरोज शहा तसेच शिक्षिका रोहिणी चारोस्कर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उमेश मुरकुटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या वतीने शिक्षक फिरोज शहा यांनी वनविभागाचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg