पाली बेणसे (धम्मशील सावंत) - अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा घाट घालून समाजातील ऐक्य नष्ट करण्याचा आणि घटनात्मक हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सुधागड तालुक्याच्या वतीने आज सोमवारी जोरदार घोषणाबाजी देत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. व तहसीलदार आणि पोलीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला व निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेने सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय तसेच समानतेची हमी दिली असून अनुसूचित जातींच्या संरक्षणासाठी विविध घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
दीर्घ संघर्षानंतर अनुसूचित जाती समाजाला आरक्षणाचा घटनात्मक अधिकार मिळाला असून, उपवर्गीकरणाचा निर्णय समाजात मतभेद निर्माण करणारा, सामाजिक ऐक्यावर परिणाम करणारा व अनुसूचित जातींच्या एकात्मतेला बाधा आणणारा ठरू शकतो, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे. महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. अनुसूचित जातींची सद्यस्थितीतील आरक्षण व्यवस्था जशीच्या तशी कायम ठेवावी. उपवर्गीकरणाचा कोणताही एकतर्फी निर्णय न घेता समाजघटक व तज्ज्ञांशी चर्चा करावी. अनुसूचित जातींच्या घटनात्मक आणि सामाजिक हक्कांचे रक्षण केले जावे. या मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा संघटक राहुलभाई सोनावळे, सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीचे तालुका अध्यक्ष दीपक पवार, आरपीआयचे सुधागड तालुका अध्यक्ष भगवान शिंदे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रभाकर गायकवाड, बहुजन विद्यार्थी संघटना व आरपीआयचे अमित गायकवाड, आरपीआयचे माजी तालुका अध्यक्ष सुरेश जाधव, सुनील गायकवाड, के. टी. गायकवाड, नितेश गाईकवाड, राहुल कांबळे, रोहिणी जाधव, संजीवनी जाधव, बौद्धजन पंचायतीचे माजी अध्यक्ष जे. एस. कांबळे, रवींद्रनाथ ओव्हाळ, राहुलमहाडिक, यशवंत गायकवाड यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.










































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.