loader
Breaking News
Breaking News
Foto

देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत ‘इंग्लिश मिडीयम स्कूल’ तळवडे शाळेचा तालुकास्तरावर ‘दुसरा क्रमांक’

सावंतवाडी :- स्वातंत्र्यवीरांच्या त्याग, बलिदान आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच कला, संस्कार आणि राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय देशभक्ती, कला-महोत्सव दिनांक ८ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला, या महोत्सवामध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडेच्या इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन दुसरा क्रमांक पटकवला. स्पर्धेतील सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल आणि शाळेला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या प्रशिक्षिका मान्या कांबळे, यांचे प्रशालेच्या सीईओ मैथिली नाईक सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका प्रणिता मयेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांकडून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तळवडे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg