loader
Breaking News
Breaking News
Foto

मा. पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम व शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुणदेच्या सरस्वती शिक्षण संकुलात वृक्ष वाटप व वृक्ष लागवड कार्यक्रम

गुणदे - येथील सरस्वती शिक्षण संकुलात मा. पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम व शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुणदेच्या सरस्वती शिक्षण संकुलात सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थांना वृक्ष वाटप करण्यात आले. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन, श्री सरस्वती पूजन व गुरुपूजन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालण्यात आला. नंतर 'ज्ञानसाधना' सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात खेड तालुका शिवसेना प्रवक्ते बाबाजी शिर्के यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. तसेच प्रशालेतर्फे मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या कार्याबद्दल गौरवोद्‌गार काढताना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सोहम मोरे, अमोल यादव, चंद्रकांत आंब्रे, संचालक संजय आंब्रे यांनी आपल्या भाषणात रामदासभाई कदम व शशिकांत चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व पृथ्वीतलावरील सर्व प्राणीमात्रांना ऑक्सिजनची असणारी गरज याकडे लक्ष वेधले. मनुष्य व इतर प्राणीमात्रांना जिवंत राहण्यांसाठी वृक्ष हेच एक स्रोत असल्याचे सांगितले. अशा प्रकारे सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणात झाडांचे महत्व पुन्हा पुन्हा पटवून दिले. सागर आंब्रे यांनी पक्षाचे समन्वयक या नात्याने बोलताना उपस्थितांप्रती समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सरस्वती शिक्षण संस्थेचे सहसचिव व शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र दत्ताराम आंब्रे यांनी संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानले व शिवसेना नेते रामदासभाई कदम व शशिकांत चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सरस्वती शिक्षण संस्थेचे चेअरमन व अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रांत दत्ताजीराव आंब्रे यांनी सर्व मान्यवरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली व शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

तसेच शेवटी मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी सुरेश आंब्रे, सोहम मोरे, सुभाष आंब्रे, सत्यवान आंब्रे, मा. सरपंच भारतीताई आंब्रे, अमोल यादव यशवंत आंब्रे, चंद्रकांत आंब्रे, धनाजी आंब्रे, अनिल आंब्रे, सिद्धार्थ लोंढे, रामचंद्र आंब्रे, नथुराम तांबे, मोहन आंब्रे, सुधाकर आंब्रे, संदीप आंब्रे व श्री. नागरगोजे सर (प्रभारी मुख्याध्यापक) सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी कराडकर यांनी सूत्रसंचालन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg