loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या सहाय्याने लाभार्थ्यांना मिळणार मोफत ई-वाहने

रत्नागिरी: जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या रोजगाराला गती देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुकर करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून रत्नागिरी जिल्ह्यातील २९ गरजू दिव्यांगांना अत्याधुनिक ‘नियोमोशन’ (NeoMotion) ई-वाहनांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. हा वितरण सोहळा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते पार पडणार आहे. हुंदाई मोबीस यांच्या CSR head रोशिना या येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ई-वाहनांमुळे दिव्यांगांचा दैनंदिन प्रवास सुकर होणार असून, त्यांना व्यवसाय, शिक्षण, अथवा नोकरीसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. ‘नियोमोशन’ हे तंत्रज्ञान साध्या व्हीलचेअरचे काही सेकंदांत रस्ता-प्रवासासाठी योग्य अशा इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर करते. हुंदाई मोबीस कंपनीने सामाजिक दायित्व जपत रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या आर्थिक व सामाजिक पुनर्वसनासाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg