loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून फोंडेकर कुटुंबियांचा गौरव

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि कृषिमंत्री यांच्याकडून उत्तम आणि आबा फोंडेकर यांना हापूस आंबा क्षेत्रातील कार्याबद्दल सर्वोच्च उद्यान पंडित पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातून उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे (सामान्य प्रशासन), आरती देसाई (इमारत व दळणवळण), शारदा पोवार (भुसंपदान व पाटबंधारे) यांनी मालवण कुंभारमाठ येथे आबा फोंडेकर यांच्या निवास स्थानी भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन फोंडेकर यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भेटीवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फोंडेकर यांना प्राप्त झालेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या पत्रांची आणि पुरस्कारांची पाहणी केली. आबा फोंडेकर आणि त्यांचे पुत्र संदीप आणि उत्तम यांच्या कृषिक्षेत्रातील कार्याची चिकाटी, आधुनिक तंत्रज्ञान आणि संघर्षातून राज्यात आणि जगात पाचवेळा आंब्याची प्रथम पेटी पाठवण्याच्या प्रवास जाणून मी घेऊन सिंधुदुर्ग कृषिभूषण असल्याचे प्रशंसा करत अभिमान व्यक्त केला. या भेटीबद्दल उत्तम फोंडेकर यांनी उपजिल्हाधिकारी घरी येऊन शुभेच्छा दिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. त्यावेळी त्यांच्या पत्नी प्रत्युषा, वडील आबा, आई, वहिनी आणि पुतणी आर्या आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg