loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम कुसुमताई वंजारे महाविद्यालय लांजा आणि वनविभाग लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दीन मोठ्या उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - श्रीराम कुसुमताई वंजारे महाविद्यालय लांजा आणि वनविभाग लांजा व सामाजिक वनीकरण लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. युवा पिढीने वाघ संरक्षण वन्यजीव आणि जैवविविधतेचे महत्त्व याबद्दल जनजागृती निर्माण करणे हा मुख्य उद्देश कार्यक्रमाचा होता. दरवर्षी २९जुलै रोजी व्याघ्र दीन साजरा केला जातो. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील, वनक्षेत्रपाल रत्नागिरी विक्रम गुरव प्रमुख मान्यवर होते. यावेळी विक्रम गुरव सामाजिक वनिकरणाचे वनक्षेत्रपाल लांजा साहेल शेख यांनी वाघ हा आपल्या अन्नसाखळीतील सर्वोच्च घटक असून जंगलचा समतोल राखण्यासाठी त्याचे अस्तित्व अत्यंत गरजेचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एक वाघ वाचवल्यास संपूर्ण जंगलाचे आणि तिथल्या जलस्रोतांचे संरक्षण होते. वाघाच्या बेकायदेशीर शिकारीबद्दल आणि त्यांच्या अवयवांच्या व्यापाराविरूध्द समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. आणि विद्यार्थ्यांनी वाघ संवर्धनात सक्रीय सहभाग घ्यावा असे मार्गदर्शन करून आवाहनही केले. तसेच टायगर फेम पेंटिंग आणि निबंध स्पर्धा या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी ’टायगर फेस पॅटिंग (वाघाचे मुख चित्र रंगवणे) स्पर्धा आणि व्याघ्र संवर्धन, या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यानी कलात्मक पध्दतीने आपल्या चेह-यावर वाघाचे चित्र रेखाटून आणि निबंधाच्या माध्यमातून वाघ वाचविण्याचा संदेश दिला.

टाईम्स स्पेशल

टायगर फेस पेटिंग स्पर्धेत भक्ती जाधव, याशिका ठकराल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर मृण्मयी करंजकर व रिया कांबळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना चषक व वृक्ष आणि सहभागी विद्यार्थ्यांना वृक्ष रोपे देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ.विक्रांत बेर्डे, डॉ.दिग्विजय लवटे यांनीही जागतीक पातळीवर आणि भारतामध्ये असलेली वाघांची संख्या आणि जंगलातल्या अभ्यासाच्या अनुभवांविषयी मौलीक मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लांजा वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक सचिन कांबळे, श्रावणी पवार, सिध्दार्थ हिंगी, नमिता कांबळे यानी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg