loader
Breaking News
Breaking News
Foto

आषाढी एकादशीचा पूर्णगडचा उत्सव सर्वाना प्रेरणा देणारा - विणा बळगे

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मुचकुंदी नदिच्या काठावर वसलेल्या पूर्णगड खारवीवाडा येथील श्री विठ्ठल रखुमाई सेवा व महिला मंडळ धानबावाडी /सितापेवाडी पेठ पूर्णगड यांच्यावतीने आषाढी एकादशीचा उत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. सकाळी काकड आरती मिलिंद चक्रदेव यांच्या मंत्रघोषात श्रीची पूजा आरती, देवदर्शन तसेच किशोरी सतीश सावंत (मॅनेजिंग डायरेक्टर खंडाळा अर्बन बँक) यांनी विठ्ठल रखुमाई मूर्तीला चांदीचे मुकुट प्रदान केले, तसेच ह भ प प्रविण सावंतदेसाई यांनी किर्तन सादर केले. नंतर शेकडो विद्यार्थी व वारकर्याच्या जल्लोषात रामकृष्ण हरी गजरात माता भगिनींच्या उपस्थितीत दिंडी सोहळा थाटात साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सायंकाळी माऊली महिला भजन मंडळ रत्नागिरीचे भजन व रात्रौ महिला मंडळाच्यावतीने ग्रुप डान्स व महाराष्ट्र राज्यातील पहिले सादर करणारे आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ यांच्या नमनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. दुसर्या दिवशी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा व सायंकाळी विठ्ठल रखुमाई महिला मंडळातर्फे विणा बळगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अक्षया शिवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी हळदिकुंकू समारंभ कार्यक्रम जल्लोषातच साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी अक्षया शिवलकर यांनी या कार्यक्रमात पंढरपूर वारीचे महत्व सांगितले. तर हा उत्सव म्हणजे समता, एकता, बंधुता व उत्कृष्ट संघटन असणारे हे मंडळ माऊलीच्या रुपात सर्वाना प्रेरणा देणारे आहे म्हणूनच प्रत्यक्षात माऊली या उत्सवात आहे, असा भास मला जाणवतो असे उदगार अध्यक्षीय भाषणात विणा बळगे यांनी काढले.

टाईम्स स्पेशल

यावेळी अध्यक्ष आकांक्षा डोर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रखुमाई महिला मंडळातर्फे पाहुण्यांना व शेकडो महिलांना भेटवस्तू देवून सन्मानीत करण्यात आले. त्या नंतर श्री परशुराम प्रासादिक भजन मंडळ पावस बुवा संजय पावसकर, तसेच श्री देव महापुरुष भजन मंडळ पूर्णगड रत्नागिरी बुवा वासुदेव वाघे यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. योगेश डोर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वाचे आभार मानण्यात आले. तसेच आई महालक्ष्मी प्रासादिक वारकरी दिडी भजन मंडळ ईळये देवगड सिधुदूर्ग यांचा दिडी भजनाचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांनी घेवून आनंदीमय वातावरणात विठ्ठल रखुमाई सेवा व महिला मंडळाच्यावतीने हा उत्सव साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg