चिपळूण, : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता चिपळूण येथील शिक्षण पतपेढी हॉल, प्रांत कार्यालय, चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न होणार असून, जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चेडे हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते हे स्वागताध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार असून, तालुका सरचिटणीस उमेश सकपाळ व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
या मेळाव्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करणे, प्रत्येक गावात पक्षाची संघटना बळकट करणे, जनाधार वाढविणे तसेच समाजावरील अन्याय-अत्याचाराविरोधात प्रभावी लढा उभारण्याबाबत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यास राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, महाराष्ट्र राज्य सदस्य दादासाहेब मर्चेडे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार, मुंबई युवक अध्यक्ष सचिनभाई मोहिते, कोकण प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. उमेश पवार, रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष ॲड. प्रशितोष कदम, रत्नागिरी जिल्हा पर्यावरण अध्यक्ष ॲड. सुरेंद्र तांबे यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक व आंबेडकरी विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे. संघटन विस्तार, कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण आणि आगामी राजकीय वाटचालीसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.