मुंबई, - मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संस्थेच्या विश्वस्तांनी लिहिलेल्या एका पत्राचा दाखला देत या मंदिरात होत असलेल्या चोरीवर आवाज उठवला होता. त्यानंतर सिद्धिविनायक ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सिद्धिविनायक मंदिरातील चोरीतील आरोपी शिवसेनेच्या ठाकरे गटाशी संबंधित असलयाचा गंभीर आरोप केल्याने राजकारणदेखील तापले आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना या चोरीविषयी टीकेची तोफ डागताच प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. श्री. सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेवून या घोटाळ्याचे स्वरूप उघड केले. त्यांनी सांगितले की, मंदिराला मिळालेल्या दानाची चोरी बर्याच काळापासून सुरू होती. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ) ने सापळा लावून पाळत ठेवली होती. ज्यादिवशी मंदिरातील रोकड मोजली जात होती, त्यादिवशी एसीबीचे प्रमुख अधिकारी मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर तैनात होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सारे कैद झाले. पाळत ठेवणार्या एसीबीच्या कर्मचार्यांनी चोरी करताना रंगेहाथ पकडले. या चोरी प्रकरणात मुख्य आरोपी राजन पेंडूलकर हा असल्याची माहिती सरवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याला त्याच्या ८ साथीदारांसह अटक करण्यात आली आहे.
या चोरीला आता राजकीय वळण लागले आहे. राज ठाकरेंनी याबाबत आवाज उठविल्यानंतर लगोलग पत्रकार परिषद घेवून सिद्धिविनायक मंदिर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सदा सरवणकर यांनी चोरीची माहिती उघड केली. पत्रकार परिषदेत बोलताना माजी आ. सदा सरवणकर यांनी या चोरीत सामील असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) या पक्षाशी संबंधित असल्याचा खळबळजनक आरोप केला. चोरीचा आरोप असलेल्या कर्मचार्यांना उबाठाच्या नेत्या माजी आमदार विशाखा राऊत यांनी कामावर ठेवले होते, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. ज्या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यातील बहुतेकजण उबाठाच्या शाखांमध्ये नियमितपणे जात असत असे सांगताना चोरीचे जे प्रकरण उघडकीस आले आहे ते संपुर्ण प्रकरण मागील विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळातील आहे, असा दावादेखील पत्रकार परिषदेत सरवणकर यांनी केला आहे. सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सिद्धिविनायक मंदिरात झालेली चोरी ही केवळ दानपेट्यांमधील पैसे काढण्यापुरती मर्यादित नव्हती तर त्यामध्ये अनेक पद्धतींचा समावेश होता. ट्रस्टच्या असेही निदर्शनास आले आहे की, ऑनलाईन माध्यमातून पैसे स्विकारून व्हीआयपी दर्शनाची सोय करून दिली जात होती. याप्रकरणी एकूण १९ जणांवर खटला चालवण्यात येत आहे.
सरवणकर यांनी सांगितले की, काही कर्मचार्यांनी मंदिराबाहेरील फुलं विकणार्या दुकानदारांशी संगनमत केले होते. ते भाविकांकडून पैसे घेऊन त्यांना दर्शनासाठी पाठवत असत. आता या घोटाळ्याची संपुर्ण चौकशी व्हावी यासाठी सीबीआयकडे मागणी करण्यात आली आहे. केवळ मंदिरातील कर्मचार्यांनीच ही चोरी केली नसून त्यामागे मोठे नेटवर्क असू शकते. ज्या माध्यमातून तिजोरीतील कोट्यावधी रुपये चोरीला गेले आहेत. आम्ही पदभार स्विकारल्यानंतर ही चोरी उघडकीस आणली असा दावा सरवणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत कोणताही पत्रव्यवहार मंदिर संस्थेने केला नसल्याचा खुलासा या पत्रकार परिषदेत सदा सरवणकर यांनी केला. विधी आणि न्यायविभागाने प्रशासनाला आर्थिक अहवाल सादर करण्यात सांगितले होेते, असे विश्वस्त राहुल लोंढे यांनी स्पष्ट केले. हा अहवाल प्राप्त झाल्यावर राज्य सरकार पुढील कायदेशीर कारवाई निश्चित करत असते त्यानुसार ही प्रक्रिया पार पडली असे सांगण्यात आले. सरवणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मे २०२६ मध्ये ट्रस्टींनी विधी आणि न्याय विभागाकडे विशेष लेखापरीक्षण करण्याची विनंती केली. आपण स्वतः एसीबीचे प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार केल्याचा दावाही सरवणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.