loader
Breaking News
Breaking News
Foto

निळवणे शाळेच्या पत्रा शेड चा लोकार्पण सोहळा संपन्न

खेड - जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मिळवणे नंबर १ या शाळेच्या इमारतीला पावसाळ्यात गळती लागत असल्यामुळे या इमारतीवर पत्रा शेडचे बांधकाम खेड तालुक्यातील उधळे गावचे सुपुत्र उद्योजक बशीरभाई हजवाणी यांच्यावतीने हजवाणी फाउंडेशनच्या माध्यमातून निळवणे नं. १ शाळेतील इमारतीला छप्पर बांधकाम करुन मिळावे. यासाठी पोलीस पाटील जगन्नाथ कदम व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून पत्रा शेड मिळावी यासाठी बशीरभाई हजवाणी यांच्याकडे संपर्क साधला होता. यावेळी माझ्या वतीने मी या शाळेला शाळेच्या इमारतीवर पत्राशेड उभारून देईन, असे आश्वासन बशीरभाई हजवाणी यांनी दिले होते. त्याची पूर्तता करून या पत्रा शेडचा उद्घाटन सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी या संस्थेचे बशीरभाई हजवाणी, कळबणी केंद्राचे केंद्रीय प्रमुख मिलिंद शिंदे, लायन्स क्लब खेडचे अध्यक्ष अविनाश दळवी, सुरेश चिकणे, लायन विनोद मोरे, लायन डॉक्टर मर्कट, लायन संदीप मोरे, निळवणे गावचे निवृत्त सुभेदार गोपीनाथ कदम, काशीराम कदम, बाळकृष्ण सणगरे, शिवाजी कदम, चंद्रकांत कदम, शामराव कदम, संदेश खोपडे, विश्वास कदम, रवींद्र कदम, पंकज कदम, अनंत सणगरे, दत्ताराम गोगडे, अंकुश धोत्रे, बाळाराम तांबट, भागोजी बडबे, लक्ष्मण सणगरे, लक्ष्मण निर्मळ, संतोष राणीम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अस्मिता खोपडे, दीपिका निर्मळ व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी शिक्षणासाठी लागणारे सहकार्य करण्यास मी नेहमीच तत्पर असेन व माझ्या खेडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन. असे मत आपल्या मनोगतातून हजवाणी यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नितीन साळुंखे, मोहन सोनवणे, अनंत मोरे,पदवीधर शिक्षक विशाल सोनवलकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश खोपडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नितीन साळुंखे यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg