loader
Breaking News
Breaking News
Foto

संगम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पैसा फंड हायस्कूल परिसरात वृक्षारोपण

संगमेश्वर / सत्यवान विचारे : सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी संगम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज संगमेश्वर येथील पैसा फंड हायस्कूल परिसरात उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाला शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे कार्यवाह धनंजय शेटये, प्राचार्य खामकर सर आणि पर्यवेक्षक दळवी सर यांनी संगम ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी संघाच्या वृक्षारोपणासारख्या लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत उपस्थितांचे आभार मानले. वृक्षारोपणानंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेतील विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. त्या सोडविण्यासाठी शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शाळेच्या भव्य कला दालनालाही भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. या कार्यक्रमाला संगम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद शेटये, उपाध्यक्ष उदय संसारे, कोषाध्यक्ष जनार्दन शिरगावकर, समिती सदस्य श्रीप्रकाश कोळवणकर, प्रभाकर वाडकर, विनय मुरकर, अविनाश चोचे, विलास चव्हाण, विजय निवळकर, मुझफ्फर मुल्ला यांच्यासह संस्थेचे कार्यवाह, प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

संगम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे राबविण्यात येणारे वृक्षारोपण तसेच विविध लोकोपयोगी उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व जपणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg