loader
Breaking News
Breaking News
Foto

सुर्वेवाडीतील विद्यार्थ्यांना कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे वही-पेन वाटप; उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक

खेड, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नातुनगर ग्रामपंचायती अंतर्गत सुर्वेवाडी या कोकणातील अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यातील गावातील विद्यार्थ्यांना कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशन, खेड (रजि.) यांच्या वतीने वही व पेनचे मोफत वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची साथ पोहोचविणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिल शिंदे (सदस्य, ग्रामपंचायत नातुनगर) होते. यावेळी बोलताना त्यांनी, "कोकणातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उमेद मिळते," असे गौरवोद्गार काढले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विद्या उर्फ कस्तुरी धैर्यशील आमनगी, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती खेड, संध्या एकनाथ चाळके, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती खेड आणि ज्योती भरत आंब्रे, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती खेड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला बाबाराम पवार (सामाजिक कार्यकर्ते), श्रीकांत सकपाळ (सामाजिक कार्यकर्ते), संदेश जाधव(सामाजिक कार्यकर्ते),तसेच कृष्णा पाटील (कृष्णा मोबाईल शॉपी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

टाईम्स स्पेशल

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल येसोंडे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमासाठी शैक्षणिक साहित्य देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल काते कन्स्ट्रक्शनचे मालक नवनाथ सदानंद काते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशीकांत शिंदे, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत नातुनगर यांनी केले. कार्यक्रमास नातुनगर परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. शिक्षणासाठी समाजाने पुढे यावे आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg