loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा पेजे महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

रत्नागिरी - लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिवार आंबेरे रत्नागिरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, कला आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा आणि समृद्ध कार्याचा परामर्श समजावा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा प्रभाव विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावा यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यासाठी प्रा. कल्पना मेस्त्री प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभल्या. अण्णाभाऊ साठे यांचे बालपण, तारुण्य आणि त्यांनी ज्या संघर्षमय वातावरणात सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली, अशा संपर्ण जीवनप्रवासाचा आढावा देत त्यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधित केले. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर थूळ यांनी आपल्या अनुभवी वाणीतून कथात्मक स्वरूपात अण्णाभाऊंचे जीवनपट रेखाटले. प्रा.अर्चना चव्हाण यांनी प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांना बहुमोल विचार प्रकट केले.

टाईम्स स्पेशल

या जयंती सोहळ्याचे कार्यक्रम अध्यक्ष राजस मोहिते यांनी अण्णाभाऊंचे विचार आपण कसे कृतीत आणले पाहिजेत? हे आपल्या मार्मिक शब्दात मांडले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन समृध्दी कुड आणि आभारप्रदर्शन स्वप्नाली वाळिंबे यांनी केले. या सोहळ्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले, त्यामुळे सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg