loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर कुटगिरी येथे लोखंडी साकव कोसळून एक बैल दगावला तर सहा जनावरे जखमी

रत्नागिरी (टाइम्स डिजिटल डेस्क): माणसं मेली की घटना मोठी असते पण पशु मात्र दगावले तर ती घटना मोठी समजली जात नाही, पुणे फार दुर्दैवी म्हटले पाहिजे. हा विचारच माणुसकीला सोडून आहे, गुहागर तालुक्यातील उदगीर येथे लोखंडी साकव कोसळला, जेव्हा त्यावरून ही जनावरे जात होती. त्यासोबत जर माणसे जातानाची वेळ असती तर आणखी मोठी घटना घडली असती, या घटनेवरून असे दिसते की, अजूनही ग्रामीण भागात पुरेशी दळणवळणाची व्यवस्था झालेली नाही. गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांच्या मतदारसंघातील ही घटना आहे, शेतकरी कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत सरकारने करावयाची गरज स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाण नजीक असलेल्या ठिकाणी लोखंडी दाखव अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. दाखव कोसळताना त्याखाली सहा ते सात जनावर अडकली, एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. सहा जनावरे या लोखंडी साठवत अडकली त्यांची सोडवणूक करण्यासाठी गुहागर आपत्ती व्यवस्थापन विभागाला तत्काल बोलवण्यात आले, त्यांनी मदतीचा हात दिला. दुर्घटना घडल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभिंता, पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी बैलांवर उपचार सुरू आहेत, असे समजते.

टाइम्स स्पेशल 3

या दुर्घटनेमुळे ग्रामीण भागातील जुन्या लोखंडी साकवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, अशा लोखंडी साकवांची माहिती जिल्हा प्रशासनाने एकत्रित करण्याची गरज असून अशा लोखंडी साकवांचे निरीक्षण व्हायला हवे, धोकादायक संरचनांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg