loader
Breaking News
Breaking News
Foto

माखजन हायस्कुल येथे टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व ॲड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रास्ताविकातून मुख्याध्यापक महादेव परब थोर समाज सुधारकांच्या, क्रांतिकारकांच्या,स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान देणाऱ्या थोर पुरुषांच्या जयंती ,पुण्यतिथी साजरी कशासाठी केली जाते,याविषयी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.शिक्षक रवींद्र पवार यांनी लोकमान्य टिळक, आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्राविषयीं, आणि त्यांच्या अद्वितीय कार्याचा आढावा घेतला. दोन्ही महापुरुषांनी देशासाठी केलेल्या कामाविषयीं सांगताना विद्यार्थ्यांनी देखील काही अंशी अनुकरण केले तरी खूप होईल असे नमूद केले. यावेळी ट्रस्ट तर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षीसांचे वितरण करण्यात आले.संस्था सह सचिव दीपक शिगवण यांनी मनोगत व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमावेळी लोकमान्य टिळक,अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत,स्मृतींना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विशाखा धावडे यांनी केले यावेळी व्यासपीठावर सहसचिव व कार्यक्रमांचे अध्यक्ष दीपक शिगवण, गणेश शिंदे उपस्थित होते. आभार पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी मानले. कार्यक्रमची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg