loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजणारी घाटात वळणावर भीषण अपघातानंतर ट्रक पेटला

मुंबई (संजय साळवी) - गोवा महामार्गावरील आंजणारी पूल नजीक भरधाव ट्रकला वळणावर शनिवारी सायंकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. अपघात इतका भिषण होता की, ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. ट्रकमध्ये टेलकम पावडर होती. त्यामुळे मालासह ट्रकचे संपूर्णतः नुकसान झाले. या घटनेची माहिती लांजा पोलिसांना मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर लांजा पोलिस हातंखबा वाहतूक पोलिस यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. अपघात घडल्यानंतर ट्रक चालक आणि क्लिनर हे जखमी अवस्थेत बाहेर निघाले पण त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालवाहू ट्रक मुंबईहून गोव्याकडे जाते होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg