loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयात विद्यार्थी शपथ ग्रहण सोहळा संपन्न

खेड - खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु. कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ मध्ये शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर सचिन धाडवे (जिल्हा परिषद सदस्य), मानसी जगदाळे (जिल्हा परिषद सदस्य), सतिश चिकणे (उपनगराध्यक्ष, नगरपरिषद खेड), संग्राम कदम (पंचायत समिती सदस्य), प्रशांत चव्हाण (पंचायत समिती सदस्य), वैभवी घाडगे (सरपंच, वेरळ-जांबुर्डे ग्रुप ग्रामपंचायत), संजय शिंदे (पोलिस पाटील, वेरळ), महेश जगदाळे, गणेश जाधव, स्वरदा जाधव यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या मूर्तीचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांमध्ये वक्तशीरपणा, नेतृत्व, बंधुता, एकता, आत्मविश्वास यांसारखी मूल्ये लहानपणापासून रुजावीत यासाठी प्रशालेमध्ये मतदान घेऊन विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यात आले. यामध्ये अलफिजा चौगुले (पंतप्रधान), मतिन परकार (उपपंतप्रधान), इब्राहीम नाडकर(गृहमंत्री), श्रीया गांधी (शिक्षणमंत्री), वेदांत चव्हाण (क्रिडामंत्री), आर्या पाटील (सांस्कृतिकमंत्री), शेरीश पालेकर (माहिती व तंत्रज्ञान मंत्री), अंश यादव (आरोग्यमंत्री), संकेत मुंडे (कुटुंब कल्याणमंत्री), तहरिन नांदगावकर (पर्यावरण मंत्री) या विद्यार्थ्यांनी सर्वांसमक्ष मंत्रीपदाची शपथ घेऊन सर्वांना वचन दिले. तसेच विद्यार्थांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहित केले आणि संस्थेला व विद्यार्थांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन दिले. यावेळी संस्थाध्यक्ष श्री.सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, प्राचार्य डॉ.एस. एस.अली, सीईओ विजय रॉबर्ट,पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन फातिमा पालेकर, अलहाना जसनाईक, दिक्षा मोहीते यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg