loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरात महाराजस्व शिबिर अभियानातून तब्बल १ हजार ७७२ नागरिकांना समाधान

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन व स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील सुमारे १ हजार ७७२ नागरिकांनी आपले विविध दाखले प्राप्त करून समाधान मिळविले. लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान महसूल या ब्रीदवाक्यातून हे शिबिर अभियान राबविले जात आहे. गुहागरमध्ये या शिबिरात १ हजार ७७२ सेवा/योजना लाभ/उतारे/दाखले नागरिकांना मिळवता आले. अनेक वेळा नागरिकांची काही कामे अनेक वर्ष प्रलंबित असतात मात्र या शिबिराच्या माध्यमातून कागदपत्रांची पूर्तता केल्यावर अनेकांना आपले प्रलंबित पुरे करण्यात यश आले. त्यामुळे खरोखरच या शिबिराचे समाधान लाभार्थी वर्गाला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे ५७९ दाखले, महिलांना शेतकरी ३१६ दाखले ,स्वामीत्व योजना सनद ४४ स्वामित्व योजना ग्रामपंचायतीस नकाशा १० वीज वितरण कंपनी ३, मत्स्य व्यवसाय परवाना बोट परवाना १० ,आयुष्यमान कार्ड ५०, घरकुल ताबा पावती ५८, स्वच्छ भारत मिशन शौचालय मंजुरी आदेश १९, ज्येष्ठ साहित्यिक कलाकार मानधन मंजूरी आदेश १० जन्म मृत्यू दाखले ३५, गणवेश वाटप ४, महिला बाल विकास सेवा योजना ३९, बांधकाम कामगार ओळखपत्र १२ जिल्हा उद्योग मासेमारी बोट व फूड व्हॅन २ कृषी यांत्रिकीकरण ४ मागेल त्याला काजू ३०, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा मंजूरी आदेश ३, पीएम स्वनिधी ९५ तसेच इतर योजनांचे लाभार्थी व इतर विभागाकडील दाखले त्याचप्रमाणे एका आठवड्यातील मंजूर फेरफार सातबारा आठ अ उतारे प्रति इत्यादी लाभ या शिबिरातून येथील तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना घेता आले.

टाईम्स स्पेशल

तहसीलदार परिक्षीत पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय उत्कृष्ट काम करत हे शिबिर यशस्वी केल्याने शिबिरासाठी उपस्थित मान्यवरांनी या शिबिराबाबत व महसुलच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. सध्या नवनवीन योजना व ऑनलाईन सुविधा शासनाकडून वारंवार प्रसिद्ध केल्या जातात नागरिक या योजनांचा लाभ देखील घेतात. मात्र या शिबिराच्या माध्यमातून अतिशय सुलभ रीत्या व कमी खर्चात या नागरिकांना हा लाभ घेणे शक्य झाल्याने उपस्थित नागरिकांमधून या शिबिराबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg