loader
Breaking News
Breaking News
Foto

जनतेच्या समस्या जाणून घेत त्या त्वरित मार्गी लावा, आम शेखर निकम यांच्या अधिकारी वर्गाला सुचना

देवरुख (सुरेश सप्रे) - तालुक्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सर्व काही खातेप्रमुखांनी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून सामान्यांना दिलासा मिळेल. याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आम. शेखर निकम यांनी देवरुख येथील संपर्क कार्यालयात नागरिकांशी चर्चासत्राव्दारे संवाद साधला त्यावेळी केले. संगमेश्वर तालुक्यातील सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांजाणून घेत त्यावर संबधितांनाकडून तातडीने उपाययोजना करुन दिलासा मिळावा यासाठीच आमदार शेखर निकम यांनी देवरुख येथील संपर्क कार्यालयात नागरिकांशी चर्चासत्राव्दारे संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या चर्चासत्रात आम. शेखर निकम. तालुकाध्यक्ष राजू पोमेंडकर. शहराध्यक्ष हनिफ हरचीरकर, युवक तालुकाध्यक्ष प्रतीक साळवी, पंकज पुसाळकर, नितीन भोसले, बाळु ढवळे या पदाधिकारीसह तहसीलदार अमृता साबळे यांचेसह बांधकाम/कृषी/जलजीवन आदी अधिकारी उपस्थित होते. या चर्चासत्रात प्रामुख्याने येडगेवाडीला पाणी पुरवठा करणाऱ्यासाठी बसवलेला पंप बेकायदा तोडून धनगरवाडीतील पाणीपुरवठा खंडित झाला. तो पुर्ववत करण्यात यावा. यासाठी संतोष येडगे व सहकारी यांनी लक्ष वेधले. देवरूख सह ताम्हाणे, तुळसणी भागात गत आठवडाभर वीज खंडित होत असल्याने नागरीकांना होणार त्रास कमी व्हावा यासाठी उपसभापती प्रफुल्ल बाईत, युवक तालुकाध्यक्ष प्रतीक साळवी, संतोष पाल्ये, पपु गोवळकर, हनीफ हरचीरकर यांनी ही समस्या सोडविण्यासाठी लक्ष वेधले.

टाईम्स स्पेशल

तसेच देवरुख शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी उबाठाकडून नगरसेवक बाळा कामेरकर, निधा कापडी, तालुकाप्रमुख बोरूकर, क्रांती व्यापारी संघटनेचे निखिल कोळवणकर आदींनी लक्ष वेधले. या चर्चासत्रात विविध ठिकाणी गावातील अनेकांनी सहभागी होत आपल्याला येणाऱ्या समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी आम. निकम यांनी संबधीत माहितीपूर्ण आणि अधिकारी वर्गाला विचारणा करत यावर तातडीने सर्व काही अडचणी समजून घ्या व त्यांचे निकारण करण्यासाठी त्वरित कार्यवाही करून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा, अशा सुचना संबधीत अधिकारी वर्गाला दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg