loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर–बेलोसे महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाची शिरसोली येथे क्षेत्रीय भेट; विद्यार्थ्यांनी घेतला भातशेतीचा प्रत्यक्ष अनुभव

दापोली : वराडकर–बेलोसे महाविद्यालय, दापोली येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक ३० जुलै २०२६ रोजी तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रीय भेट (Field Visit) व कृषी प्रात्यक्षिक उपक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम शिरसोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथील प्रगतिशील शेतकरी मंगेश जाधव आणि मंगेश भैरमकर यांच्या शेतात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या क्षेत्रीय भेटीमध्ये विद्यार्थ्यांना भात रोपे काढणी, मळणी, रोपे लावणी तसेच पारंपरिक भातशेतीच्या विविध टप्प्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी, दर्जेदार बियाण्यांची निवड, रोपवाटिका तयार करण्याची पद्धत, रोपांची योग्य काळजी, लागवडीचे अंतर, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, तण नियंत्रण तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनी स्वतः शेतामध्ये उतरून भाताची रोपे काढणे, मळणी करणे आणि रोपलागवड करणे या सर्व कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना कृषी क्षेत्रातील श्रमाचे महत्त्व, शेतकऱ्यांचे कष्ट, कृषी व्यवस्थापन तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे असलेले स्थान यांची प्रत्यक्ष जाणीव झाली. वर्गात शिकविण्यात येणाऱ्या अर्थशास्त्रातील कृषी, ग्रामीण विकास आणि उत्पादन व्यवस्थापनाशी संबंधित संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून अधिक स्पष्ट झाल्या. या उपक्रमासाठी तृतीय वर्ष कला शाखेतील अर्थशास्त्र विषयाचे एकूण २० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. लक्ष्मण सीताफुले, प्रा. डॉ. गणेश मांगडे आणि प्रा. दीपक गडकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना क्षेत्रीय अभ्यासाचे महत्त्व, कृषी अर्थशास्त्रातील प्रत्यक्ष निरीक्षणाचे मूल्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना अशा उपक्रमांची आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

शेतकरी मंगेश जाधव आणि मंगेश भैरमकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून आधुनिक व पारंपरिक शेती पद्धतींची तुलना, भातशेतीतील आव्हाने, उत्पादन खर्च, बाजारपेठेतील चढ-उतार, हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम आणि शाश्वत शेतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधत विविध प्रश्न विचारून शेतीविषयक ज्ञान आत्मसात केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, अनुभवाधारित शिक्षण आणि ग्रामीण वास्तवाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा क्षेत्रीय अभ्यास उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. उपस्थित विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शैक्षणिक उपक्रमांमुळे अभ्यास अधिक समजण्यास मदत होत असल्याची भावना व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg