मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील विविध ठिकाणचे वाहतुकिच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या मार्गांवर ठिक ठिकाणी खड्डे पडल्याने तेथील वाहतूक धोक्याची झाली आहे. मात्र रस्त्यातील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत आणि विनाअपघात करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मंडणगड तालुक्यातील मंडणगड पालवणी मार्गे दापोलीकडे येणार्या मार्गावर मंडणगड तालुक्यातील जांभूळ नगर हद्दीतून जाणार्या महत्त्वाच्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने या मार्गावरील वाहतूकीला चांगलाच ब्रेक बसला आहे. तर मंडणगड पाट मार्गे म्हाप्रल आंबेत पुलावरून पुढे मुंबईकडे जाणार्या रस्त्यावर पाण्याचे डोह तयार झाल्याने येथे अपघाताची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे.
तसेच मंडणगड पाचरल मार्गे घोसाळे पणदेरी पेवे म्हाप्रल मार्गावर घोसाळे बौध्दवाडी जवळील रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे या मार्गावरील वाहतुक धोक्याची झाली आहे. त्याचप्रमाणे मंडणगड देव्हारे केळशी मार्गाचीही सेम तशीच परिस्थिती आहे. मंडणगड तालुका हा दुर्गम आणि डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. अशा या तालूक्यातील आंबवडे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ गावी आंबवडे या पावन भूमीत देशभरातील लोक नेहमीच येत असतात. तसे बाणकोट किल्ला (हिम्मत गड), कासवांचे गाव ओळखले जाणारे वेळास, दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून संबोधल्या गेलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्री. क्षेत्र हरिहरेश्वरकडे मंडणगड देव्हारे वेसवी जेटीवरुन जाणारा मार्ग असेल नाहीतर पूणे मुंबई अशा मोठ्या शहरांकडे मंडणगडहून आंबेत पुलावरून जाणारा मार्ग असेल वा म्हाप्रळहून महाडकडे जाणारा मार्ग असेल या मार्गाचा उपयोग केवळ मंडणगड याच तालुक्यातील रहिवाशांपुरता मर्यादित असे नाही.
दापोली तसेच खेड तालुक्यातील काही गावांसाठी तसेच दापोलीत मोठ्या संख्येने येणार्या पर्यटकांना मंडणगड तालुक्यातून पुढे दापोलीकडे कमी वेळेत आणि जास्त इंधनाचा अपव्यय न होता जाता येते. अशा या एकुणच महत्वाच्या रस्त्यांची दुरवस्था ही सुरक्षित प्रवासासाठी खरंच धोक्याची झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या महत्त्वाच्या समस्यांकडे अजिबात लक्ष देत नाही, परिणामी रस्त्यातील खड्डे तसेच आहेत ते वाहतुकिला अडथळा ठरत आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.