loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वखर्चातून शालेय परिसराची साफसफाई; संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांचा आदर्शवत उपक्रम

मालवण, (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वाढलेले रान व गवत स्वखर्चातून कापून परिसर स्वच्छ करण्याचा स्तुत्य उपक्रम ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांनी राबविला असून त्यांच्या या सामाजिक जाणिवेबद्दल ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवसभर दोन ग्रासकटरच्या साहाय्याने शाळेचा परिसर तसेच सभोवतालच्या परिसरातील वाढलेले रान व गवत कापून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित झाला असून विद्यार्थ्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून होणारा संभाव्य धोका कमी होण्यास मदत झाली आहे.

टाईम्स स्पेशल

संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून राबविलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाचे विद्यार्थ्यांचे पालक, संस्था सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. तसेच त्यांच्या या सामाजिक जाणिवेबद्दल ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg