नवी मुंबई (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, यंदाच्या गणेशोत्सवात ०११५५/०११५६ दिवा-खेड मेमु सेवा सुरू होणार असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण यांनी दिली. प्रकाशराव चव्हाण यांनी सांगितले की, संघटनेने यापूर्वी खेड-दिवा मेमु सेवा सुरू करण्यासाठी सातत्याने कोकण रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. या मागणीला अखेर यश मिळाले असून, यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याचबरोबर संघटनेच्या वतीने नुकतेच कोकण रेल्वेचे संचालक संतोष झा यांना निवेदन देऊन वसई रोड-चिपळूण मेमु सेवा तातडीने सुरू करावी, तसेच खेड रेल्वे स्थानकाच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी संरक्षक शेड उभारण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. चव्हाण म्हणाले की, खेड रेल्वे स्थानकावर खेड, दापोली, मंडणगड, पोलादपूर तसेच महाबळेश्वरच्या सीमावर्ती भागातील हजारो प्रवासी दररोज ये-जा करतात. एवढे महत्त्वाचे स्थानक असूनही अनेक मूलभूत सुविधा अद्याप अपुर्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना उन्हाळा व पावसाळ्यात मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.
दरम्यान, संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी खेड रेल्वे स्थानकावर अधिकाधिक लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा तसेच खेड-दिवा मेमु सेवा गणेशोत्सवानंतरही कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे. मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.










































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.