loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे ग्रामविकास मंडळाची प्रथम ‘त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा’ मुंबईत उत्साहात संपन्न

प्रकाश चाळके(देवळे)- एकत्रित ग्रामस्थ समृद्ध गाव या ध्येयाने कार्यरत असलेल्या देवळे ग्रामविकास मंडळ, मुंबई यांची प्रथम त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी परळ येथील ढहश डेलळरश्र डर्शीींळलश ङशरर्सीश, छ. च. गेीहळ तळवूर डरपर्ज्ञीश्र येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी मंडळाचे सचिव राकेश गुरव यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून सभेस उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. सभेच्या अध्यक्षपदी संजय काळोखे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर देश, महाराष्ट्र तसेच देवळे गावाच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान देणार्‍या दिवंगत थोर व्यक्तींच्या स्मृतीस अभिवादन करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. मंडळाचे सचिव राकेश गुरव यांनी मागील तीन वर्षांच्या कार्याचा आढावा घेणारा त्रैवार्षिक छापील अहवाल सभेसमोर सादर करून वाचून दाखविला. अहवालाची प्रत उपस्थित सभासदांना देण्यात आली. मंडळाने मागील तीन वर्षांत केलेल्या विविध सामाजिक, ग्रामविकासात्मक व संस्थात्मक कार्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विठोबा गार्डी, प्रदीप शिंदे, दिनेश साळवी, घागरे आदींनी आपले विचार मांडून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. त्यानंतर त्रैवार्षिक अहवालास सभेने सर्वानुमते मंजुरी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभेतील सर्वाधिक महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन कार्यकारिणीची निवड. मागील अनेक वर्षे सचिवपदाची जबाबदारी सांभाळणारे राकेश गुरव यांनी प्रकृतीच्या कारणास्तव तसेच पुरेसा वेळ देता येत नसल्याने सचिवपदाची जबाबदारी बदलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या कार्याचे उपस्थित सभासदांनी कौतुक केले. त्यानंतर संजय काळोखे यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. सभेने पुढील कार्यकारिणीची एकमताने निवड केली. अध्यक्ष संजय काळोखे, कार्याध्यक्ष राकेश गुरव, सचिव ऍड. निलेश सकपाळ, खजिनदार रविंद्र पांचाळ, उपाध्यक्ष बालकृष्ण चव्हाण व आनंद साळवी, सहसचिव प्रदीप शिंदे, विश्वास घाग व दिनेश साळवी संघटक सचिव मनोहर रातांबे, अजय कदम व गौरी काळोखे हिशेब तपासनीस प्रकाश गार्डी सल्लागार प्रशांत काळोखे व सचिन देवरुखकर याशिवाय अनिल साबळे, सविता लखाटे, अविनाश शिंदे, रविंद्र मुगदार, दिपक काळोखे, विठोबा गार्डी, जितेंद्र साळवी, धीरज पंडित, मंगेश सिदम, मंगेश कदम, संतोष कदम व उमेश कदम यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

मंडळाने आगामी काळात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व ग्रामविकासाच्या क्षेत्रात अधिक व्यापक उपक्रम राबवावेत, तसेच सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून मंडळाची वाटचाल करावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नवीन अध्यक्ष संजय काळोखे यांनी सर्व सभासदांना विश्वासात घेऊन मंडळाचे कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व संघटित पद्धतीने करण्याचा निर्धार व्यक्त केला. देवळे ग्रामविकास मंडळाच्या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून मंडळाच्या सामाजिक कार्याला नवी दिशा व नवा वेग मिळणार असून, एकत्रित ग्रामस्थ समृद्ध गाव हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी मंडळ आगामी काळात अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वास सभेत व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg