आबलोली(संदेश कदम)- विद्यार्थ्यांनी केवळ पदवी शिक्षणापुरते मर्यादित न राहता विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश करून देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, तसेच करिअरच्या व्यापक संधींचा लाभ घ्यावा या उद्देशाने चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे स्पर्धा परीक्षा संधी, तयारी आणि यशाची दिशा या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सिमा शुल्क विभागाचे वरीष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी सत्यवान रेडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये विभाग प्रमुख डॉ.हरिश्चंद्र भागडे यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या मार्गदर्शनात रेडकर यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात स्पर्धा परीक्षांचे वाढते महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी लवकर सुरू करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC), केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), कर्मचारी निवड आयोग (SSC), बँकिंग, रेल्वे, विमा, पोलीस भरती तसेच विविध केंद्रीय आणि राज्य शासनाच्या सेवांमधील रोजगाराच्या संधींची त्यांनी सविस्तर माहिती दिली. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता नव्हे तर सातत्य, शिस्त, वेळेचे योग्य नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि नियमित अभ्यासाची सवय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभ्यासाचे वार्षिक, मासिक आणि दैनंदिन नियोजन कसे करावे, कोणती संदर्भ पुस्तके वाचावीत, चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा, वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व, उत्तरलेखनाचा सराव, वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याची पद्धत तसेच मुलाखतीसाठी आवश्यक असलेले व्यक्तिमत्त्व विकासाचे पैलू यांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कृषी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय विभागांतील रोजगाराच्या संधी, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, बँकिंग क्षेत्र, अन्न प्रक्रिया उद्योग, संशोधन संस्था आणि कृषी क्षेत्रातील प्रशासकीय सेवांमध्ये करिअर घडविण्याच्या संधींबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची दिशा निश्चित करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रेडकर यांनी स्वतःच्या अनुभवांच्या आधारे अनेक प्रेरणादायी उदाहरणे सांगितली. अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकत पुढे जाणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे हेच यशाचे खरे रहस्य असल्याचे त्यांनी सांगितले. ध्येय निश्चित करा, वेळेचा सदुपयोग करा, नियमित अभ्यास करा आणि कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास गमावू नका; यश निश्चित तुमचेच असेल, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रम, तयारीची सुरुवात, संदर्भ साहित्य, वेळेचे व्यवस्थापन, मुलाखतीची तयारी तसेच करिअरच्या विविध संधी यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. रेडकर यांनी प्रत्येक प्रश्नाचे अत्यंत समर्पक, सविस्तर आणि प्रेरणादायी उत्तर देत विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले. या मार्गदर्शनामुळे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी नव्याने उत्सुकता निर्माण झाली असून भविष्यात शासकीय सेवेत करिअर करण्यासाठी आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागांच्या माध्यमातून करणयात आले.उपस्थितांनी सत्यवान रेडकर यांच्या अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि विद्यार्थीहिताच्या मार्गदर्शनाचे मनापासून कौतुक केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.