loader
Breaking News
Breaking News
Foto

जी.जी.पी.एसमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

रत्नागिरी : हिंदू संस्कृतीची परंपरा जपत प्रत्येक सण आणि उत्सव आनंदाने साजरा करणार्‍या जी.जी.पी.एस च्या ‘श्री स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी’ विभागाने आपल्या चिमुकल्यांसोबत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. यावर्षी शाळेने गुरु पौर्णिमेनिमित्त मातृ-पितृ पूजन सोहळा आयोजित केला होता. ज्या सोहळ्यात पालक अगदी उत्साहाने सहभागी झाले होते. मुलांनी आई-वडिलांचे औक्षण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. पालकांनी मुलांना गुरु शिष्याच्या काही गोष्टी,काही गाणी गायली.त्यामुळे मुलेही खुश झाली. शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमानुसार विद्यार्थी विविध गुरु-शिष्यांच्या वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता, सावित्रीबाई फुले व विद्यार्थिनी, द्रोणाचार्य आणि एकलव्य अशा गुरु शिष्यांच्या विविध वेशात मुले तयार होऊन आली होती. जे आजच्या पिढीसाठी गुरु-शिष्य परंपरेचे आदर्श आहेत. गुरु-शिष्य परंपरा सांगणार्‌या विविध कथा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या. चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही भाषणे दिली,कथा सांगितल्या. गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांनी गुरु म्हणून शिक्षकांविषयीचा आपला आदर व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

प्री-प्रायमरी विभागाच्या प्रमुख शुभदा पटवर्धन, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या अपूर्वा मुरकर, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीत हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg