loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी दाभोळ पुरस्कृत ए. वन. जल फायटर आयोजित दाभोळ येथील जिल्हास्तरीय प्रो गोविंदा स्पर्धा उत्साहात

दापोली (प्रतिनिधी) : गोकुळाष्टमीला अजून एक महीना शिल्लक असतानाच दाभोळ मध्ये भारतीय जनता पार्टी दाभोळने पुरस्कृत केलेल्या ए वन जल फायटर आयोजित जिल्हास्तरीय प्रो गोविंदा स्पर्धेला जमलेल्या तुफान उत्साही गर्दीने आयोजकांनी आयोजिलेली आणि पुरस्कर्त्यानी पुरस्कृत केलेली प्रो गोविंदा स्पर्धा खरंच यशस्वी झाली. हे आयोजकांचे आणि पुरस्कर्त्यांचे मनोबल वाढणारे तर आहेच मात्र त्यानिमित्ताने का होईना जिल्ह्यातील नामवंत गोविंदा पथकांनी दिलेली सलामी आणि त्यांच्या पारंपरिक ढंगातील नाच सर्वांना आँखो देखा हाल प्रत्यक्ष अनुभवता आला. दापोली तालुक्यातील दाभोळ या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावात दाभोळ येथील भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत केलेली आणि ए वन जल फायटर ने आयोजित केलेल्या जिल्हा स्तरिय प्रो गोविंदा स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 8 गोविंदा पथकानी आपला प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्यातच तेरेवायंगणी येथील श्री देवी मरीआई प्रतिष्ठान महिला गोविंदा पथकाने 4 थरांचा उस्फुर्त मानवी मनोरा रचत दाभोळ वाशीयांसह अवघ्या जिल्हाभरातील उपस्थितांची चांगलीच मने जिंकली. तर हिंदू राज पथकाने 7 थरांचा मनोरा रचत दादा असल्याचे दाखवून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशा या प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये चिपळूण गोळकोट येथील श्री गणेश गोविंदा पथक, जालगाव येथील हिंदू राज प्रतिष्ठान गोविंदा पथक, हर्णे फणसवाडी येथील नागेश्वर गोविंदा पथक, मंडणगड भिंगलोली येथील कन्हैया गोविंदा पथक हर्णे राजवाडी येथील श्री गजानन गोविंदा पथक, चिपळूण मार्कंडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथक, हर्णे येथील हिंदू एकता गोविंदा पथक या गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. तसेच दाभोळ कुंभारवाडी येथील नवचैतन्य मित्र मंडळ गोविंदा पथकाने हौशी खातर पाच थराची सलामी दिली. तसेच हिंदू राज गोविंदा पथक जालगाव यांनी सात थर लावून सलामी दिली. या प्रो गोविंदा स्पर्धे दरम्यान एकुण चार क्रमांक काढण्यात आले. यामध्ये चिपळूण गोवळकोट येथील श्री गणेश गोविंदा पथकाला प्रथम क्रमांकाचा मान देऊन मान्यवरांचे शुभहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तर गोलकोट चिपळूण, द्वितीय क्रमांकाचा मानकरी दापोली तालुक्यातील हर्णे येथील अनुक्रमे नागेश्वर गोविंदा पथक फणसवाडी व्दितीय तर राजवाडीच्या श्री गजानन गोविंदा पथकाला तृतीय तसेच हिंदू एकता गोविंदा पथकाला चतृर्थ क्रमांकाने गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून साळूंके, दळवी आणि क्षिरसागर यांनी पंचाची यशस्वी भूमिका पार पाडली.

टाईम्स स्पेशल

या प्रो गोविंदा स्पर्धा कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा प्रो गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय फाटक, उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्मिता जावकर, दाभोळ ग्राम पंचायतीच्या सरपंच राखी तोडणकर, उपसरपंच अभय गोयथळे, उदय जावकर, पंचायत समिती सदस्य श्रीराम ऊर्फ भाऊ इदाते, भाजपा तालुकाध्यक्ष जया साळवी, भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन होडबे, भाजपा सरचिटणीस योगेश सुर्वे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष वैशाली इदाते, माजी सरपंच संगीता दाभोळकर, ग्रामपंचायत सदस्य समित भाटकर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दाभोळ येथील ए वन जल फायटर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज खडपकर, उपाध्यक्ष ऋषिकेश शिरगावकर, सचिव अथर्व खडपकर, खजिनदार विजय खडपकर तसेच ए वन जलफायटरचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे दिमाखदार आणि आनंदोत्सव साजरा करणाऱ्या या सोहळ्यात दाभोळ गावातील व परिसरातील तसेच जिल्ह्यातील शौकीन हजाराच्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg