रत्नागिरी, - राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'मिशन लक्ष्यवेध' उपक्रमांतर्गत, पुणे विभागस्तरीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी हॉकी (मुली) खेळाची निवड चाचणी ७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही चाचणी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे सकाळी १० वाजता पार पडेल. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र महिला खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. पुणे विभागाच्या क्रीडा निपुणता केंद्रासाठी यापूर्वी २३ व २४ मार्च २०२६ रोजी ॲथलेटिक्स, शुटींग, रोईंग, कुस्ती, टेबल टेनिस आणि हॉकी या सहा खेळांची निवड चाचणी झाली होती. मात्र, त्यावेळी हॉकी (मुली) या खेळासाठी अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे आता केवळ मुलींच्या हॉकीसाठी ही चाचणी नव्याने घेण्यात येत आहे.
वय: २५ वर्षांच्या आतील मुले/मुली (संबंधित वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी). अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा किंवा राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेले असावे. निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी स्वतःचे क्रीडा साहित्य सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच खालील मूळ कागदपत्रे सोबत असावीत: जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (LC), अधिवास प्रमाणपत्र (Domicile), आधार कार्ड, मागील २ वर्षांतील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
या निवड चाचणीसाठी उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागेल. राज्यातील क्रीडा विकासासाठी 'मिशन लक्ष्यवेध' हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याअंतर्गत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा सक्षम करणे, पायाभूत सुविधांचा विकास, स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना प्रोत्साहनपर पुरस्कार, करिअर मार्गदर्शन तसेच देशी-विदेशी संस्थांच्या मदतीने खेळाडूंचा क्षमता विकास या सर्व बाबींवर भर दिला जात आहे.या निवड चाचणीबाबत अधिक माहिती हवी असल्यास खेळाडूंनी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील प्रतिनिधींशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा: वैशाली सूळ: ७४४७४९१८८८, विवेंडा डिकोस्टा: ९८२३९३२०९७
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.