loader
Breaking News
Breaking News
Foto

अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक प्रदान

कर्जत (जयेश जाधव): रायगड पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या एका विशेष गौरवात, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या उत्कृष्ट तपासकौशल्य, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण) प्रदान करण्यात आले. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते हे प्रतिष्ठेचे पदक प्रदान करण्यात आले. त्यांच्या गुणवत्तापूर्ण तपासकार्याची तसेच गुन्ह्यांच्या तपासामध्ये दाखविलेल्या उल्लेखनीय कौशल्याची या पुरस्कारातून गौरवपूर्ण दखल घेण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अभिजीत शिवथरे यांच्या अथक परिश्रम, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, समर्पण आणि प्रभावी तपासकौशल्याचा हा सन्मान असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे रायगड पोलीस दलाच्या लौकिकात आणखी भर पडली आहे. केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक मिळाल्याबद्दल अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांचे रायगड पोलीस दलासह विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg