खेडः- तालुक्यातील भोस्ते येथील जगबुडी नदीकाठच्या रस्त्यावर विक्रीसाठी गांजा बाळगणार्या दोघा तरुणांना खेड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी १ लाख ९७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भोस्ते जगबुडी नदीवरील पूल ते देवना पूल दरम्यान जाणार्या नदीकाठच्या रस्त्यावर करण्यात आली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सोहेल इकबाल ढगे (नेमणूक खेड पोलीस ठाणे) यांनी फिर्यादी दिली असून, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गु.र.नं. २१६/२०२६ नुसार अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम-१९८५ मधील कलम ८ (क), २० (ब), २ (ब), २९ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात इरफान इद्रीस खान (वय १९ वर्षे, रा. मुस्लीम मोहल्ला, आंबेड खुर्द, ता. संगमेश्वर), मोहम्मद साद साजिद शहा (वय १८ वर्षे ११ महिने, रा. दखनी मोहल्ला, कसबा, ता. संगमेश्वर) या दोघांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी आपल्या ताबा व कब्जात विक्रीसाठी गांजा हा अंमली पदार्थ बाळगून असताना आणि त्याच्या विक्रीसाठी आवश्यक असणार्या साहित्यासह रंगेहाथ सापडले.
जप्त केलेल्या मालामध्ये १५,९७२ रुपये किमतीचा १०७२ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा, १५,००० रुपये किमतीचा स्मार्टफोन, २०,००० रुपये किमतीचा स्मार्टफोन, ५०,००० रुपये किमतीची पर्ल व्हाईट रंगाची टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर १२५ दुचाकी (वाहन क्र. चक ०८ इक ३१११) या मुद्देमालाचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.