loader
Breaking News
Breaking News
Foto

रोगापेक्षा इलाज भयंकर! पावसात महामार्गाच्या खड्‌ड्याला मातीचा मुलामा, ठेकेदाराची जीवघेणी शक्कल!

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली ते बावनदी दरम्यान हायवेला खड्डे पडले आहेत परंतु या खड्‌ड्यांना आता मातीचा मुलामा देण्यात कंत्राटदार धन्यता मानत आहेत त्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असून, रस्त्यावर माती मुरूम टाकण्यात आल्याने वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे वाहन चालक व प्रवासी जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळे अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडून पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे, तर काही ठिकाणी संबंधितांकडून रस्त्यावर मातीचा मुलामा टाकण्यात आल्याने या ठेकेदार कंपनीचा नियोजन शून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत असून, एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टाइम्स स्पेशल

चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरीही अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडलेले आहेत. या खड्‌ड्यातून वाहनचालकांना रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे, तर खड्‌ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने खड्‌ड्यात वाहन जाऊन वाहने नादुरुस्त होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या सर्व प्रकाराने प्रवासी जनता व स्थानिक नागरिकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg