loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा घाटात दरड कोसळली; सर्व शासकीय टीमसह आमदार भैया सामंत पाहणीसाठी

देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरी नागपूर रस्त्यावरील अतिमहत्त्वाचा आंबा घाटात एका बाजूने रस्ता खचल्याने जड वाहनांना रस्ता बंद केला असून छोट्या गाड्यांसाठी रस्ता खुला आहे. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून संबंधित ठेकेदार व तहसीलदार अमृता साबळे, देवरुख पोलीस स्टेशनचे पी.आय.पवार यांच्यासह आंबा घाटात प्रत्यक्ष दरड पडलेल्या ठिकाणी पाहणी करून काही मार्ग काढता येईल का याची चर्चा करून ठेकेदार व सर्व यंत्रणा यांच्याशी चर्चा करून पुढील सहाचाकी वाहनांना मार्ग खुला करण्याबाबत विचारविनिमय चालू होता. मात्र अवजड १०/ १२/ १६ चाकी वाहनांना सध्या रस्ता बंद ठेवण्यात आल्याचे म्हटले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत आमदार भैय्या सामंत यांना विचारले असता या रस्त्यावरून सहा चाकी वाहनांना रस्ता खुला करण्याबाबत जिल्हाधिकारी, वाहतूक पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल असे म्हटले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg