loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या नूरैन परकारची संसदरत्न पुरस्कारावर मोहोर

खेड (प्रतिनिधी) - कृष्णा सहदोया काॅम्प्लेक्स सांगली यांनी आयोजित केलेल्या युथ पार्लमेंट स्पर्धेत रोटरी स्कूलच्या इयत्ता 9 वीत शिकणारी विद्यार्थीनी नुरैन परकार हिने ’संसदरत्न पुरस्कार’ मिळवत रोटरी स्कूलच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या सई संतोष कदम, अर्णव रेनिश पिल्लई, प्रणव नितीन गांगर्डे, नुरैन जमिल परकार, पूर्वी पूनम, लक्ष्मण बेले या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून आपल्यातील कौशल्य दाखवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नूरैनच्या या यशाबददल शाळेत आनंदाचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिच्या वत्कृत्वकौशल्य, संसदीय प्रक्रियेची जाण आणि विषयावरील प्रभुत्वामुळे तसेच नेतृत्वगुणांच्या जोरावर तिला हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही स्पर्धा नेतृत्वगुण या श्रेणी अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये 21 व्या शतकातील कौशल्य आत्मसात करणे अर्थात नैतृत्व, प्रभावी संवादकौशल्य, चिकित्सक विचार, सहकार्य, समस्या निराकरण क्षमता, आत्मविश्वास यांसारखी जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

टाइम्स स्पेशल

वरील सर्व यशस्वी स्पर्धकांना प्रीती नायर, दर्पण पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg